चिन्मय पाटणकर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (राज्य मंडळ) आर्थिक तोट्यात आहे. उत्पन्नाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात खर्च वाढल्याने मंडळाला ४० ते ५० कोटींचा फटका बसत असून, आर्थिक नुकसानावर नियंत्रणासाठी दहावी-बारावीचे परीक्षा शुल्क ३० टक्क्यांनी वाढवण्याचा प्रस्ताव राज्य शासनाला देण्यात आला आहे.

Millions of online bets on IPL in gadchiroli
गडचिरोली : ‘आयपीएल’वर कोट्यवधीचा ऑनलाईन सट्टा!
mining projects in sindhudurg
सिंधुदुर्गातील खनिज प्रकल्प कायमचे बंद व्हावेत; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पर्यावरणवाद्यांना अपेक्षा
More than 20 thousand farmers objected to MMRDA notification
‘एमएमआरडीए’च्या अधिसूचनेला २० हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या हरकती
pimpri chinchwad, drain cleaning work
पिंपरी: नालेसफाई अद्याप कागदावर!

हेही वाचा >>>फुकट काजूकतली दिली नाही; पुण्यात दुकानदारावार गोळी झाडण्याचा प्रयत्न

राज्य मंडळ ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था आहे. दहावी आणि बारावीच्या साधारणपणे तीस लाख विद्यार्थ्यांची परीक्षा राज्य मंडळामार्फत घेतली जाते. राज्य मंडळ स्वायत्त असल्याने आर्थिक कारभार संस्थेच्याच स्तरावर केला जातो. दहावी-बारावीचे परीक्षा शुल्क, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रतींचे शुल्क आदी माध्यमातून राज्य मंडळाला उत्पन्न मिळते. सध्या दहावीचे शुल्क ३७५ रुपये, तर बारावीचे शुल्क ४१५ रुपये आहे. परीक्षा शुल्क आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतींच्या माध्यमातून साधारणपणे १८० कोटींचे उत्पन्न मिळते. राज्य मंडळाने २०१७ मध्ये केलेल्या शुल्कवाढीनंतर गेल्या सहा वर्षांत शुल्कवाढ केलेली नाही. मात्र दरम्यानच्या काळात अन्य खर्चांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे उत्पन्नात वाढ न होता खर्च वाढल्याने राज्य मंडळ तोट्यात गेल्याची माहिती राज्य मंडळातील सूत्रांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

हेही वाचा >>>पुणे: अमेरिकास्थित माजी विद्यार्थ्याकडून ‘सीओईपी’ला ८.२५ कोटींची देणगी; गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चासाठी देणगीचा वापर

संस्थेला राज्य शासनाकडून निधी दिला जात नाही. आस्थापना खर्चासह शासनाच्या नियमांनुसार कर्मचाऱ्यांचे वेतन, निवृत्त कर्मचाऱ्यांचे निवृत्तिवेतन यासह विद्यार्थ्यांसाठीच्या सोयीसुविधा, परीक्षकांचे मानधन, कंत्राटी कर्मचाऱ्याचे वेतन आदी खर्च मंडळालाच करावा लागतो. पूर्वी दहावी आणि बारावीचे मिळून साधारणपणे ३५ लाख विद्यार्थी असायचे. आता विद्यार्थी संख्या ३० लाखांपर्यंत कमी झाल्याने उत्पन्नात वाढ झालेली नाही. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये इंधनाचे दर वाढले, कागदाचे दर वाढले, मनुष्यबळाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परिणामी ४० ते ५० कोटींचा तोटा मंडळाला सहन करावा लागत आहे. मंडळाच्या ठेवींचे व्याज खर्चासाठी वापरण्याची वेळ मंडळावर आली आहे. मंडळाच्या उत्पन्नात वाढ न झाल्यास मंडळ आर्थिक अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या शुल्कात ३० टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाला दिला आहे. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास पुढील वर्षीपासून शुल्कवाढ लागू करण्यात येईल.-शरद गोसावी, अध्यक्ष, राज्य मंडळ