पुण्यातील देहूरोड येथे किरकोळ वादातून झालेल्या मारहाणीत चार महिलांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर दोघाना अटकही करण्यात आली आहे. या मारहाणीत महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनू शेख आणि नागेश रेड्डी यांचे शेजारी शेजारी मोबाईलचे दुकान आहे. ही कुटुंबे राहतातही शेजारीच. त्यांच्यात नेहमीच किरकोळ कारणावरून भांडणे होत असत. मात्र काल रात्री देहूरोडमधील अबूशेट रोड येथील मोबाईलच्या दुकानावरील वाद विकोपाला गेला. रागाच्या भरात नागेश रेड्डी याने पेट्रोलची बाटली फिर्यादी सोनू शेख यांच्या दुकानावर भिरकावली यात दुकानाने पेट घेतला. पण वेळीच आग विझवण्यात आली आणि अनर्थ टळला. मात्र, याचा जाब विचरण्यासाठी फिर्यादी सायिदा शेख या सोनूच्या आई गेल्या असता त्यांना बेदम मारहाण केली. त्यावेळी त्यांच्यासोबत जुबेदा शेख, जायीदा शेख, सईद नबिब शेख, सबदसुग खान हेही उपस्थित होते.

या मारामारीच्या प्रकरणात सर्व महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी राकेश लोकेश रेड्डी आणि राजू रेड्डी यांना अटक केली असून त्यांना २६ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्यात येणार आहे. या घटनेत परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास सुरु असल्याचे देहूरोड पोलिसांकडून सांगण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 4 women bitten by iron rod in dehuroad pune injuerd
First published on: 22-02-2018 at 18:46 IST