scorecardresearch

Premium

पुणे:विसर्जन मिरवणुकीत नाचताना एकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

गणेश विसर्जन मिरवणुकीत नाचताना एकाचा हृदयविकाराच्या झटक्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री नगर रस्त्यावरील वाघोली परिसरात घडली.

man dies while dancing during immersion procession
प्रातिनिधिक छायाचित्र

गणेश विसर्जन मिरवणुकीत नाचताना एकाचा हृदयविकाराच्या झटक्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री नगर रस्त्यावरील वाघोली परिसरात घडली. गणेश बाळकृष्ण दळवी (वय ४४ , रा. उमंग होम प्राईम सोसायटी, वाघोली ) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. उमंग होम प्राईम सोसायटी गणेश मंडळचीमिरवणूक गुरुवारी सायंकाळी काढण्यात आली. सायंकाळी सातच्या सुमारात मिरवणूक नाचत असताना दळवी कोसळले. दळवींना वाघोली येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. दळवी यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. लोणीकंद पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मित मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.

vasai accident marathi news, woman run over by car marathi news
वसई : चारचाकी वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू, अर्नाळा राजोडी रस्त्यावरील घटना
buldhana crime news, son in law killed with bat marathi news, son in law killed by mother in law marathi news
जावयाच्या डोळ्यात मिरपूड टाकून बॅटने बेदम मारहाण! सासुविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल; शेगाव तालुक्यातील घटना
Death of a child in nagpur
नागपूर : उकळते पाणी अंगावर पडून चिमुकल्याचा मृत्यू
kolhapur, two murder in kolhapur, kolhapur crime news,
कोल्हापूरात खूनाचे सत्र; कुडित्रेत मद्यपीकडून वृद्धाचा खून, इचलकरंजीत तरुणाची निर्घृण हत्या

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 44 year old man dies while dancing during ganesh immersion procession pune print news rbk 25 zws

First published on: 29-09-2023 at 18:31 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×