मोबाईलवर आलेला एक टेक्स्ट मॅसेज आपलं बँक खातं रिकामं करू शकतं, अशी सूचना तुम्ही ऐकली असेल. पण अशी घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. तुमचं बँक खात सस्पेंड होणार असून दिलेल्या लिंकवर तुमचा पॅनकार्ड अपडेट करा, असं भासवून आणि लिंक वर क्लिक करण्यास भाग पाडून एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा घातला आहे. या प्रकरणी अशोक विठ्ठलराव मडावी (वय- ५०) यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना एका मोबाईल नंबरवरून SBI बँकेचे नेट बँकिंग सस्पेंड होणार आहे. तुमचं पॅनकार्ड अपडेट करा अशा आशयाचा इंग्रजीत टेक्स्ट मॅसेज आला. त्यात एक लिंक दिलेली होती. शहानिशा न करता त्यावर क्लिक करून तक्रारदार यांनी पॅनकार्ड अपडेट केले तसेच माहिती आणि ओटीपी भरून दिला. काही सेकंदातच त्यांच्या SBI बँक खात्यातून ४ लाख ९५ हजार रुपये कमी झाल्याचा मॅसेज आला. आपली फसवणूक झाल्याचं समजताच अशोक विठ्ठल मडावी यांनी भोसरी पोलिसात तक्रार दिली आहे.

दरम्यान, बँकेत जाऊन संबंधित लिंकबद्दल माहिती घेऊनच लिंकवर जाऊन पॅनकार्ड अपडेट करावे, शक्यतो अशा लिंकवर क्लिक करू नये, असं आवाहन सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस अधिकारी तुंगार यांनी दिली आहे. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.