जगद्गुरु संत तुकाराम महाराज, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या दोन्ही पालख्या पुण्यातून पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या आहेत. देहू आणि आळंदीतून प्रस्थान सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला. करोनानंतरचा पहिलाच पालखी सोहळा असल्याने यावर्षी वारकऱ्यांची मोठी गर्दी झाली होती. याच गर्दीचा फायदा घेऊन अनेक चोरट्यांनी वारकरी भाविकांचे मंगळसूत्र, पाकिटांवर डल्ला मारला आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अशाच काही गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यासाठी वेषांतर केले होते. यामुळं ६० जणांना पकडण्यात पोलिसांना यश आले असून त्यांच्याकडून तब्बल साडेपाच लाखांचे सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केलेत. 

देहू, आळंदी परिसरात पालखी सोहळ्यासाठी आलेल्या २२५ संशयित व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. पैकी, ६० जणांना गुन्हा करताना पोलिसांनी रंगेहाथ पकडलं असून अटक करण्यात आली आहे. दोन वर्षानंतर पालखी सोहळा वारकऱ्यांच्या उपस्थित पार पडला. त्यामुळं मोठ्या प्राणावर गर्दी झाली होती. याचा फायदा चोरटे उचलत होते. अशी माहिती पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिली आहे. 

Mumbai, Two arrested,
मुंबई : वृद्धाचे सोने लुटणाऱ्या दोघांना अटक
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
Property worth lakhs was robbed in two house burglaries in nashik
नाशिक : जिल्ह्यात दोन घरफोडींमध्ये लाखोंचा मुद्देमाल लंपास
Tipeshwar Sanctuary
VIDEO : टिपेश्वर अभयारण्यात वाघच नाही, तर रानकुत्र्यांसह ‘या’ वन्यप्राण्यांना पर्यटकांची पसंती

गुन्हे शाखा आणि पोलिसांची आठ पथक नेमण्यात आली होती –

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, देहू, आळंदीत पालखी सोहळ्यात पाकिटमार, सोनसाखळी चोर येणार असल्याची शक्यता लक्षात घेऊन गुन्हे शाखा आणि पोलिसांची आठ पथक नेमण्यात आली होती. ते दिवस- रात्र गस्त घालत होते. हे सर्व अधिकारी कर्मचारी साध्या आणि वारकऱ्यांच्या वेशात फिरत होते. ज्या जिल्ह्यातून चोरटे येण्याची शक्यता होती तेथील आरोपींना ओळखणारे खबरी आणले होते. अशी माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे.

दोन्ही पालख्यांमधील २२५ संशयितांना ताब्यात घेण्यात आल. पैकी, ६० जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. सोनसाखळी आणि पाकीट मारणे या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली आहे, यात महिलांचा देखील समावेश आहे.