येरवड्यात पूर्ववैमनस्यातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली. दोन्ही गटांकडून गज, काठ्या, कोयत्यांचा वापर करुन दहशत माजविण्यात आली. या प्रकरणी पोलीस दफ्तरी नोंद असलेल्या अकरा सराईत गुन्हेगारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पायल दत्ता साठे ( वय २०, रा. मच्छी मार्केट, येरवडा ) आणि जगन्नाथ तुकाराम काकडे ( वय ५५, रा. शेलार चाळ , येरवडा ) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.

हेही वाचा- पुणे: शासकीय वाहनांकडूनच वाहतुकीचे नियम धाब्यावर; ८५ पैकी ८० वाहने विना’पीयूसी’

पायलने तीन महिन्यांपूर्वी दत्त उर्फ अनिकेत साठे याच्याशी प्रेमविवाह केला. अनिकेतसह साठे कुटुंबातील नऊ जणांच्या विरुद्ध दोन वर्षांपूर्वी काकडे यांचा मुलगा आदर्श याच्या खुनाचा आरोप आहे. या कारणावरुन त्यांचात नेहमी वाद होतात. साठे आणि काकडे गटात दोन दिवसांपूर्वी रात्री हाणामारी झाली. दोन्ही गटांकडून गज, कोयते, काठ्यांचा वापर करण्यात आला. या प्रकरणी जय अँथनी, अनिकेत जगन्नाथ काकडे, गणेश जगताप, सोनू उर्फ रॅडो, आदित्य गमरे, अनिकेत उर्फ दत्त्ता राजू साठे, रोैनक चव्हाण, अभय जंगले, अमन भिसे, ऋत्विक साठे, राजू कचरू साठे ( सर्व रा. येरवडा) यांच्याविरुद्ध बेकायदा जमाव जमवून हाणामारी आणि खुनी हल्ला केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पसार आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.

हेही वाचा- पुणे: बीआरटीचे जाळे कागदावरच ! अस्तित्वातील बीआरटी मृत्युशय्येवर; पाच वर्षांत एकही नवीन मार्ग नाही

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भगवान गुरव आणि अंकुश डोंबाळे तपास करत आहेत.