पुणे : मार्केट यार्डातील डाॅ. आंबेडकर नगर वसाहतीत किरकोळ वादातून दोन गटात हाणामारी झाली. कोयते, तलवारी उगारुन आरोपींनी दहशत माजविली. या प्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनिलसिंग सिकंदरसिंग टाक (वय २१, रा. डाॅ. आंबेडकरनगर, मार्केट यार्ड) याने याबाबत मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी दत्ता भिसे (वय २९), नितीन भिसे (वय १९), विजय भिसे, अजय भिसे (वय २६, रा. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरनगर, मार्केट यार्ड) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या बरोबर असलेल्या साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी आणि तक्रारदार टाक एकाच भागात राहायला आहेेत. दत्ता भिसेचा पुतण्या भरधाव वेगाने दुचाकीवरुन निघाला होता. त्या वेळी टाकने गाडी हळू चालव, असे त्याला सांगितले. या कारणावरुन आरोपी कोयते घेऊन टाक याच्या घराजवळ आले. कोयते उगारुन दहशत माजविली. टाक याला बेदम मारहाण करण्यात आली.

हेही वाचा >>> पुणे : लोणावळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ, सहारा पूल परिसरात युगुलाला लुटले

दरम्यान, दत्ता भिसे याने मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, पिंटूसिंग दुधानी (वय ३८), अनिलसिंग सिकंदरसिंग टाक (वय २१), सिकंदरसिंग राजूसिंग टाक (वय ४०), रोहित दुधानी (वय १९) तसेच एका साथीदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिसे याचा पुतण्या आकाश याला आरोपी टाक यांनी मारहाण केली. त्यानंतर आकाश, त्याच्या वडिलांबरोबर मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी निघाला होता. आरोपी अनिलसिंग टाकने त्यांच्यावर तलवारीने हल्ला केला. तलवार उगारुन परिसरात दहशत माजविली. आरोपी पिंटूसिंग, अनिलसिंग, सिकंदरसिंग, रोहित यांना अटक करण्यात आली आहे. खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी दोन्ही गटातील आरोपींच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. टाक आणि भिसे गटातील आठ जणांच्या विरोधात यापूर्वी गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल झाले होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A fight broke out between two groups dispute in the market yard pune print news rbk 25 ysh
First published on: 23-01-2023 at 18:14 IST