वाकडमध्ये कामगार महिलेवर सहकाऱ्याकडून बलात्कार

हे दोघे एका केटरर्समध्ये काम करत होते.

(प्रतिकात्मक छायाचित्र )

पिंपरी-चिंचवड परिसरातील वाकड येथे एका २९ वर्षीय कामगार महिलेवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित महिलेने वाकड पोलिसात रंजन गुप्ता नावाच्या कामगाराविरोधात फिर्याद दिली आहे. हे दोघे एका केटरर्समध्ये काम करत होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रंजन गुप्ता (रा. दुर्वा वसाहत, वाकड) हा आणि पीडित २९ वर्षीय महिला हे दोघे गेल्या पाच वर्षांपासून एका केटरर्समध्ये काम करत होते. त्यांच्यात मैत्री होती. दोघेही विवाहित आहेत. मात्र गेल्या पाच वर्षांपासून पीडित महिलेचा पती तिच्यासोबत राहत नाही. याचाच गैरफायदा घेऊन महिलेच्या घरी कोणी नसताना जबरदस्ती करत रंजन गुप्ताने बलात्कार केला. याप्रकरणी पीडित महिलेने वाकड पोलिसात फिर्याद दिली असून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप रंजन गुप्ता याला पोलिसांनी ताब्यात घेतले नसून महिला पोलीस उपनिरीक्षक गोडे या अधिक तपास करत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: A rape on woman from her colleague in pimpri chinchwad wakad