पिंपरी- चिंचवडमध्ये सहा वर्षीय चिमुकल्याला भटक्या कुत्र्याने कडाडून चावा घेतल्याची घटना समोर आली आहे. चिमुकला जखमी झाला असून १३ टाके पडले आहेत. ही घटना आज सकाळी घडली आहे. मोहम्मद शेख वय- ६ वर्षे अस कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. पिंपरीतील संत तुकाराम परिसरात ही घटना घडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना पुण्यात हवी डबल डेकर बस

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरीतील संत तुकाराम नगर, शिवनेरी सोसायटी येथे घडलेल्या घटनेमुळं पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अवघ्या सहा वर्षीय मोहम्मवर भटक्या कुत्र्याने हल्ला केला असून त्याच्या डाव्या हाताला तीन ठिकाणी कडाडून चावा घेतला आहे. सुदैवाने नागरिकांनी कुत्र्याला हुसकावून लावल्याने मोहम्मदचा जीव वाचला आहे. मोहम्मद च्या हाताला गंभीर दुखापत झाली असून १३ टाके पडल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

हेही वाचा- तरुणांनी धुडगूस घातल्यानंतर गौतमी पाटीलने कार्यक्रम थांबवला, व्हिडीओ आला समोर

भटक्या कुत्र्याचा चावा इतका भयंकर होता की कुत्र्याने हाताचे लचके तोडले आहेत. या घटनेमुळं पिंपरी- चिंचवड शहरातील भटक्या कुत्र्यांचा मुद्दा ऐरणीवर आला असून पालकांनी आपल्या लहान मुलांवर लक्ष द्यायला हवं. जेणेकरून अशा गंभीर आणि जीवावर बेतणाऱ्या घटना टाळता येतील.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A stray dog attack on 6 year boy in pimpri pune kjp dpj
First published on: 09-01-2023 at 22:05 IST