पुणे : काही जणांनी कथितरीत्या पॅलेस्टाइनच्या समर्थनार्थ पत्रकांचे वाटप केल्याच्या प्रकारावरून कर्वेनगर भागात रविवारी सायंकाळी गोंधळ उडाला. या गोंधळाची, तसेच पत्रके वाटणाऱ्यांना चोप दिल्याची चित्रफीतही समाजमाध्यमात प्रसारित झाली. या घटनेनंतर दाेन्ही बाजूंचे कार्यकर्ते वारजे पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले.

रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल झाला नव्हता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्वेनगर भागात काही तरुण कथितरीत्या पॅलेस्टाइनच्या समर्थनार्थ पत्रके वाटत असल्याने काही कार्यकर्त्यांनी त्यांना रोखून आक्षेप घेतला. त्यांना जाब विचारून चोपही दिला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, गाझामधील अमानवी नरसंहाराचा विरोध करावा, असे शांततामय पद्धतीने आवाहन करणाऱ्या तरुणांवर पॅलेस्टिनींचे समर्थन करत असल्याचा आरोप करून हल्ला केला गेल्याचा दावा ‘पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज’ने पत्रकाद्वारे केला आहे.