पुणे : विधी अभ्यासक्रम करणाऱ्या महाविद्यालयीन तरुण वसतिगृहात मृतावस्थेत सापडल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. या प्रकरणी डेक्कन पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे.भूषण ढुमणे (वय १९, मूळ रा. वर्धा) असे मृत तरुणाचे नाव आहे. भूषण फर्ग्युसन महाविद्यालयाच्या आवारातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयात शिक्षण घेत होता. शुक्रवारी सकाळी महाविद्यालयाच्या आवारातील वसतिगृहात भूषण बेशुद्धावस्थेत पडल्याचे लक्षात आले.

वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी याबाबतची महिती महाविद्यालयीन प्रशासनाला दिली. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.या घटनेची माहिती मिळताच डेक्कन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांना वसतिगृहातील खोलीत औषधाच्या गोळ्यांचे पाकीट सापडले आहे.तेथे वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याची चिठ्ठी पोलिसांना सापडली आहे.भूषणचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूमागचे निश्चित कारण समजेल.पोलिसांकडून भूषणच्या मित्रांची चौकशी करण्यात आली. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे,अशी माहिती डेक्कन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांनी दिली.