इन्स्टाग्रामला मृतदेहाची स्टोरी ठेवणाऱ्या तरुणाची हत्या केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. या प्रकरणी चाकण आणि म्हाळुंगे पोलिसांनी समांतर तपास करत एकाला अटक केली आहे. आदित्य युवराज भांगरे वय- १८ असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. आदित्यचे अपहरण करून हत्या करण्यात आली. मग, महाराष्ट्र – गुजरात सीमेवर असलेल्या जंगलात मृतदेह अर्धवट जाळण्यात आला. अखेर या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. अमर नामदेवला अटक करण्यात आली असून मुख्य सूत्रधार फरार आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण पोलीस आणि म्हाळुंगे पोलीस चाकण परिसरात झालेल्या गोळीबाराप्रकरणी तपास करत असताना आरोपी अमर नामदेवला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर आरोपी राहुल संजय पवारचा भाऊ रितेश पवारची तीन महिन्यांपूर्वी हत्या करण्यात आली होती. यातील हत्या झालेला रितेश संजय पवारच्या मृतदेहाचा चेहरा इन्स्टाग्राम स्टोरीला ठेवला होता. ज्या आरोपींनी रितेशची हत्या केली ते आरोपी आदित्य भांगरेचे मित्र होते. याच संशयावरून आदित्य भांगरे याचे आरोपी राहुल संजय पवार, अमर नामदेव यांच्यासह इतर काही जणांनी त्याचे अपहरण केलं. ज्या चारचाकी वाहनात अपहरण करण्यात आलं तिथेच त्याचा वायरने गळा आवळून हत्या केली.

हेही वाचा – परभणीत महायुतीचे धक्कातंत्र

हेही वाचा – भाजपने उमेदवारी नाकारताच माजी मंत्र्याच्या कन्येचा थयथयाट

हेही वाचा – सांगलीत प्रचारात रंग भरण्यापूर्वीच रुसवे-फुगवे सुरू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आदित्यचा मोबाईल फरार आरोपी गोवा राज्यात घेऊन गेला. मात्र, अमरकडे पोलिसांनी अधिक चौकशी केल्यानंतर आदित्यचा मृतदेह हा महाराष्ट्र गुजरातच्या सीमेवरील डोंगरांमध्ये जाळल्याचे समोर आल आहे. अखेर याप्रकरणी चाकण आणि म्हाळुंगे पोलिसांनी नामदेवला अटक केली आहे. मुख्य सूत्रधार राहुल संजय पवार साथीदारांसह फरार आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत. ही कामगिरी म्हाळुंगे आणि चाकण पोलिसांनी केली आहे.