नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी बांधकाम व्यावसायिकांची असतानाही पाणीपुरवठा करण्याबाबतची शपथपत्रे घेऊन बांधकाम परवाने देण्यास प्रशासनाकडून सुरूवात झाली आहे. मात्र अनेक बांधकाम व्यावसायिकांनी खोटी शपथपत्रे दिल्याचे उघड झाले आहे, असा आरोप आम आदमी पक्षाकडून सोमवारी करण्यात आला. यासंदर्भात महापालिकेकडून बांधकाम व्यावसायिकांना नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत.

हेही वाचा >>> धक्कादायक : पुण्यात मालमत्तेच्या वादातून नातवाकडून आजीचे अपहरण

मात्र नोटीसा बजाविण्याऐवजी त्यांच्यावर गु्नहे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी आम आदमी पक्षाचे राज्य संघटक, पुणे कार्याध्यक्ष विजय कुंभार यांनी केली आहे. पाणीपुरवठ्यासंदर्भात आम आदमी पक्षाकडून काही दिवसांपूर्वी जलहक्क आंदोलन करण्यात आले होते. यासंदर्भात बोलताना विजय कुंभार म्हणाले की,मुळात माहपालिकेला पाणीपुरवठा करणे अडचणीचे ठरत असताना बांधकाम व्यावसायिक पाणीपुरवठा कसा करणार, हा प्रश्न आहे.

हेही वाचा >>> पुणे-लोणावळा रेल्वेत टीसीला बेदम मारहाण; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र त्यानंतरही पाणीपुरवठा करण्याबाबत बांधकाम व्यावसायिकांकडून शपथपत्रे घेऊन त्यांना बांधकाम परवानगी देण्यात आली. महापालिका अधिकारी आणि बांधकाम व्यावसायिकांच्या संगनमतामुळे टँकरमाफियांचे उखळ पांढरे झाले आहे. यासंदर्भात आवाज उठविल्यानंतर बांधकाम व्यावसायिकांना नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत. मात्र ही दिखाऊ कारवाई असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे आवश्यक आहे.