पिंपरी, चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील आपच्या अधिकृत उमेदवाराचा अर्ज बाद ठरण्यास कारणीभूत असल्याचा ठपका ठेवत पिंपरी-चिंचवडचे कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे यांना एक वर्षासाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, राज्य सचिन धनंजय शिंदे यांनाही कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. आपचे राज्य उपाध्यक्ष, पिंपरी-चिंचवडचे प्रभारी हरिभाऊ राठोड यांनी ही कारवाई केली.

हेही वाचा >>>पुणे: दहावी-बारावीच्या परीक्षार्थींना दहा मिनिटांचा वाढीव वेळ

चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आपने मनोहर पाटील यांना उमेदवारी दिली होती. परंतु, उमेदवारी अर्ज आणि पक्षाचा अधिकृत फॉर्म (‘बी’) अपूर्ण असल्याने पाटील यांचा अर्ज बाद झाला. पाटील यांना एबी फॉर्म कोरा देण्यात आला. तसेच उमेदवारी अर्जावर दहा अनुमोदकांच्या स्वाक्ष-या घेतल्या नाहीत. हा प्रकार जाणीवपूर्वक करण्यात आला. त्यामुळे चेतन बेंद्रे यांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. घोळामुळेउमेदवारी अर्ज बाद झाल्याचा जाब कार्यकर्त्यांनी विचारला असता बेंद्रे यांनी एका कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला केल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

हेही वाचा >>>पुणे: बांधकाम व्यावसायिक अनिरुद्ध देशपांडे यांच्या कार्यालयावर प्राप्तिकर विभागाचा छापा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आपचे प्रभारी हरिभाऊ राठोड म्हणाले, आपचे उमेदवार मनोहर पाटील यांच्या अर्जावर आवश्यक असलेल्या दहा जणांच्या स्वाक्ष-या घेतल्या नाहीत. हे सगळे जाणीवपूर्वक अर्ज बाद झाला पाहिजे यासाठी केले की काय, असा प्रश्न आहे. त्यामुळे कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे यांना एक वर्षासाठी निलंबित केले. कार्यकर्त्यांनी अर्जावर स्वाक्ष-या का घेतल्या नाहीत असे विचारले असता चिडून बेंद्रे यांनी एका कार्यकर्त्याला मारहणा केली. यामुळे पक्षाची बदनामी झाली.राज्य समितीकडून जो काही निर्णय येईल. तो मला मान्य राहील. मी पक्षाची अधिकृत भूमिका येण्याची वाट बघत आहे. कोणालाही मारहाण केली नाही असे बेंद्रे म्हणाले.