सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत पीएच.डी. प्रवेश देणाऱ्या सर्व संशोधन केंद्रांचे शैक्षणिक आणि प्रशासकीय लेखापरीक्षण करण्यात येणार आहे. संशोधन मान्यता आणि अन्य पूर्तता करणाऱ्या केंद्रांनाच पीएच.डी. प्रवेशांसाठी परवानगी दिली जाणार असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.विद्यापीठाकडून पीएच.डी. प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. मुलाखती पूर्ण झाल्यावर उमेदवारांना प्रत्यक्ष प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यापीठाकडून पुणे, नगर, नाशिक आणि सिल्वासा येथील संशोधन केंद्रांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>राज्यपालांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक; काळे झेंडे दाखविण्याची तयारी, शहराध्यक्षांना पोलिसांची नोटीस

मात्र प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी संशोधन केंद्रांचे शैक्षणिक आणि प्रशासकीय लेखापरीक्षण करण्याचा निर्णय विद्यापीठाच्या अधिष्ठात्यांच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार सर्व संशोधन केंद्रांची तपासणी करण्यासाठी विद्यापीठाकडून जिल्हानिहाय समिती नियुक्त करण्यात आली आहे. तसेच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर संशोधन केंद्रांच्या लेखापरीक्षणाचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. ५ ते १५ डिसेंबर दरम्यान सर्व संशोधन केंद्रांचे लेखापरीक्षण करण्यात येईल. या लेखापरीक्षणासाठी संशोधन केंद्रांना माहिती सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.संशोधन मान्यता आणि अन्य बाबींची पूर्तता करणाऱ्या आणि समितीने शिफारस केलेल्या संशोधन केंद्रांवरच पीएच.डी.चे प्रवेश करण्यास मान्यता देण्यात येणार असल्याचे विद्यापीठाने परिपत्रकाद्वारे नमूद केले आहे.

हेही वाचा >>>पुणे: दुचाकी टॅक्सी, ‘आरटीओ’त न्यायालयीन वाद

संशोधन केंद्रांचा तपशील
जिल्हा संशोधन केंद्र
पुणे शहर १२३
नगर ३५
नाशिक २९
पुणे ग्रामीण २८

खरोखरच कारवाई होणार?

विद्यापीठाने मान्यता दिलेल्या संशोधन केंद्रांकडून अतिरिक्त शुल्क घेतल्यासह विविध गैरप्रकारांच्या तक्रारी अनेकदा करण्यात आल्या आहेत. आता या लेखापरीक्षणातून संशोधन केंद्रातील गैरप्रकार निदर्शनास येण्याची शक्यता आहे. विद्यापीठाने लेखापरीक्षणाची केवळ कागदोपत्री प्रक्रिया न करता गैरप्रकार आढळल्याने मान्यता रद्द केलेल्या संशोधन केंद्रांची नावे जाहीर करण्याची मागणीही करण्यात येत आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Academic and administrative audit will be conducted for all research centers offering phd admissions under savitribai phule pune university pune print news amy
First published on: 02-12-2022 at 14:44 IST