पुणे : बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी झोपडपट्टी पुनर्वसन कार्यालयातील तत्कालिन उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष यादव यांच्यासह पत्नीविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केला. यादव यांची एसीबीकडून चौकशी करण्यात आली. यादव यांनी ज्ञात उत्पन्नापेक्षा एक कोटी ३८ लाख ७४ हजार रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली.

हेही वाचा >>> पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांची ८५ कोटींची मालमत्ता जप्त

याप्रकरणी शिरीष रामचंद्र यादव, त्यांची पत्नी प्रतिक्षा शिरीष यादव यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अतिरिक्त पाेलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे-खराडे यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शिरीष यादव झोपडपट्टी पुनर्वसन कार्यालयात उपमुख्य अधिकारी होते. त्यांच्याविरुद्ध यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती. त्यानंतर यादव यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरु करण्यात आली.

हेही वाचा >>> Chakan Suicide : प्रेमप्रकरणातून चाकणमधील तरुणाची आत्महत्या; दोन सेकंदांचा व्हिडीओ अन् बचाव पथकाने ३७० फूट खोल दरीत मृतदेह शोधला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सेवा कालावधीत मिळवलेल्या उत्पन्नापेक्षा जास्त उत्पन्न त्यांनी मिळवले होते. बेहिशेबी मालमत्ता जमाविल्याप्रकरणी त्यांची चौकशी सुरु झाली. उत्पन्नाबाबत यादव दाम्पत्य समाधानकारक खुलासा करुन शकले नाही. ज्ञात उत्पन्नापेक्षा यादव यांनी एक कोटी ३८ लाख ७४ हजार रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जमाविल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. उपअधीक्षक अनिल कटके याप्रकरणाचा तपास करत आहेत.