पुणे : विवाहाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीचे अपहरण करून त्यांच्यावर सोलापुरात सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात गेली नऊ वर्षे पसार असलेल्या आरोपीला वारजे पोलिसांनी अटक केली. माऊली सखाराम राजीवडे (रा. अथर्व बिल्डींग, कोंढवे धावडे, एनडीए रस्ता) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

वारजे भागातील दोन अल्पवयीन मुलींचे विवाहाच्या आमिषाने धनंजय सखाराम राजीवडे, त्याचा भाऊ माऊली यांनी अपहरण केले होते. अल्पवयीन मुली सख्या बहिणी आहेत. राजीवडेने दोन मुलींना सोलापुरात नेले. तेथे आरोपी माऊली, त्याचा भाऊ धनंजय आणि दोन अल्पवयीन मुलांनी मुलींवर सामूहिक बलात्कार केला होता. याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी धनंजय याला ५ एप्रिल २०१४ रोजी अटक केली होती.

College Girl Murdered by Friends for Ransom
धक्कादायक : विमाननगर भागातून अपहरण झालेल्या महाविद्यालयीन तरुणीचा मित्राकडूनच खंडणीसाठी खून
Kerala Student Death Case
केरळमधील जेएस सिद्धार्थन मृत्यू प्रकरण; पोलीस अहवालात धक्कादायक माहिती समोर, तब्बल २९ तास मानसिक छळ अन्…
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?

हेही वाचा – “उमेदवार होण्यापेक्षा पाडणारे बना, त्यात…”, मनोज जरांगे यांचे आवाहन; म्हणाले, “मराठा समाजात…”

धनंजयला अटक करण्यात आल्यानंतर त्याचा भाऊ माऊली पसार झाला होता. गेले नऊ वर्ष तो पोलिसांना गुंगारा देत होता. त्याने त्याचे घर बदलले होते. वारजे पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेत पोलीस निरीक्षक नीळकंठ जगताप यांची नुकतीच नियुक्ती झाली होती. गंभीर गुन्ह्यातील पसार आरोपींची माहिती त्यांनी घेतली. तेव्हा सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी माऊली पसार असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. पाेलीस शिपाई राहुल हंडाळ यांनी तांत्रिक तपास सुरु केला होता. तपासात मिळालेल्या माहितीनुसार माऊली एनडीए रस्त्यावरील कोंढवे धावडे परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याला सापळा लावून पकडले.

हेही वाचा – पुण्यात एमआयएम कोणती भूमिका घेणार ?

पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त भीमराव टेळे यांच्या मार्गदर्शनाखाली वारजे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज शेडगे, गुन्हे शाखेचे निरीक्षक नीळकंठ जगताप, उपनिरीक्षक रामेश्वर पार्वे, हवालदार सुशांत फरांदे, विष्णू म्हातारमारे, ज्ञानेश्वर गुजर, राहुल हंडाळ, रवी गाडे यांनी ही कारवाई केली.