एप्रिल- मे महिन्यातील नेहमीच्या वीजबिलांबरोबर वीजग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवींचे स्वतंत्र वीजबिल देण्यात येत आहे. या सुरक्षा ठेवीचा ग्राहकांनी भरणा करावा, असे आवाहन ‘महावितरण’कडून करण्यात आले आहे.
राज्य वीज नियामक आयोगाच्या निर्देशांनुसार सर्व वर्गवारीतील ग्राहकांना महावितरण कंपनीकडे सुरक्षा ठेव जमा करणे बंधनकारक करण्यात आले आहे. आर्थिक वर्षांतील एका महिन्याच्या सरासरी इतके वीजबिल सुरक्षा ठेव म्हणून जमा करावे लागते. वीजग्राहकांनी यापूर्वी मूळ सुरक्षा ठेव जमा केली असली तरी वीजदर, वीजवापर यामुळे वीजबिलांची रक्कम वाढली आहे. त्यामुळे मूळ सुरक्षा ठेव व गेल्या आर्थिक वर्षांतील एक महिन्याचे सरासरी वीजबिल यातील फरकाची रक्कम ‘अतिरिक्त सुरक्षा ठेव’ म्हणून देण्यात येत आहे.
वीजग्राहकांनी जमा केलेल्या सुरक्षा ठेवींवर कालावधीनुसार ९.५ टक्क्य़ांपर्यंत व्याज देण्याचे राज्य वीज नियामक आयोगाचे निर्देश आहेत. त्यानुसार ‘महावितरण’ कडून एप्रिल, मे व जून या महिन्याच्या वीजबिलांत ग्राहकांच्या सुरक्षा ठेवीवरील व्याजाची रक्कम बिलामध्ये समाविष्ट केली जाते, असे ‘महावितरण’ कडून कळविण्यात आले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 3rd May 2014 रोजी प्रकाशित
पुणेकरांना अतिरिक्त सुरक्षा ठेवींची स्वतंत्र वीजबिले
एप्रिल- मे महिन्यातील नेहमीच्या वीजबिलांबरोबर वीजग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवींचे स्वतंत्र वीजबिल देण्यात येत आहे.या सुरक्षा ठेवीचा ग्राहकांनी भरणा करावा, असे आवाहन ‘महावितरण’ने केले आहे.

First published on: 03-05-2014 at 03:15 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Additional safety deposit by mseb