लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: नगर रस्त्यावर येरवड्यातील आगाखान पॅलेससमोर भरधाव मोटारीने रस्त्यात थांबलेल्या डंपरला पाठीमागून धडक दिली. काही क्षणात मोटारीने पेट घेतला. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन पेटलेल्या मोटारीतील महिला चालकाची सुखरूप सुटका केल्याने महिला बचावली.

नगर रस्त्याने भरधाव मोटार निघाली होती. आगाखान पॅलेससमोर रस्त्यावर थांबलेल्या डंपरला भरधाव मोटारीने पाठीमागून धडक दिली. काही क्षणात मोटारीच्या पुढील भागाने पेट घेतला. शांतीबन साॅफ्टवेअर हब कंपनीच्या सुरक्षारक्षकांनी अग्निशमन यंत्रणा वापरून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती येरवड्यातील अग्निशमन दलाच्या केंद्राला कळविण्यात आली.

हेही वाचा… पुण्यातल्या सावित्रीबाई फुले विद्यापीठात अश्लील रॅप गाण्याचं शूटींग, रॅपर शुभम जाधवविरोधात गुन्हा दाखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अग्निशमन दलाचे अधिकारी सोपान पवार, चालक सचिन वाघमारे,जवान सचिन जौंजाळे, संजय कारले, राहुल वडेकर, शरद दराडे, अक्षय केदारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. मोटारीला लागलेली आग आटोक्यात आणण्यात आली तसेच मोटारीत अडकलेल्या महिलेची सुखरूप सुटका करण्यात आली. शांतीबन साॅफ्टवेअर हब कंपनीतील सुरक्षारक्षक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने मदतकार्य केल्याने मोटारीतील महिला चालक बचावली.