वैभवशाली परंपरा असलेल्या पुण्यनगरीतील गणेशोत्सवावर करोनाचे सावट असून पोलिसांकडून उत्सवासाठी नियमावली लागू करण्यात आली आहे. घरगुती गणेशोत्सव साजरा करणाऱ्यांनी खरेदीसाठी गर्दी करू नये, रस्ते, पदपथांवर मूर्ती विक्री स्टॉल लावू नयेत, तसेच प्रतिष्ठापना आणि विसर्जन सोहळ्यासाठी काढण्यात येणाऱ्या मिरवणुकांना यंदाही परवानगी देण्यात येणार नाही, आदीचा समावेश असलेली नियमावली पोलिसांनी तयार केली आहे.

तर अनंत चतुर्दशी म्हणजे गणपती विसर्जनाच्या दिवशी पुणे, पिंपरी चिंचवड आणि कॅन्टोनमेंट परिसरातली सर्वच्या सर्व दुकाने बंद राहणार आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी याविषयीची घोषणा केली आहे. जिल्ह्यातले सर्व आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी यांनी मिळून हा निर्णय घेतला असल्याचंही पवार यांनी सांगितलं.

गणेशोत्सवाचा प्रारंभ १० सप्टेंबर रोजी झाला आहे. प्रतिष्ठापना सोहळा तसेच विसर्जन सोहळ्यानिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकींना यंदा परवानगी नाही, असे सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी नियमावलीत नमूद केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.