दसरानिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये विविध कार्यक्रसांठी आलेल्या अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना मुंबईत होत असलेल्या दोन दसरा मेळाव्याबाबत मत व्यक्त केलं आहे. “उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांनी ही सामंजस्याची भूमिका घ्यायला हवी. जरूर त्यांनी स्वतःची ताकद दाखवावी, पक्ष वाढविण्याचं काम करावं, त्यांची भूमिका जनतेसमोर ठेवण्याचा ही त्यांना अधिकार आहे. पण लोकशाहीच्या परंपरा जपायला हव्यात, अनादर होणार नाही, याला कुठं ही बाधा येणार नाही, अथवा डाग लागणार नाही, आजच्या दसऱ्याच्या दिवशी कोणतीही कटुता निर्माण होणार नाही.असं त्यांनी वागावं ” असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे.

हेही वाचा… विश्लेषण: दसरा मेळाव्याची मुहूर्तमेढ केव्हा रचली? पहिल्या मेळाव्यात बाळासाहेबांना होती ‘ही’ भीती

“ठाकरे शिंदे गटाचे वाद इतक्या पराकोटीला गेलेले आहेत,की यात कोणी पुढाकार घ्यायचा हा मूळ प्रश्न आहे. शब्दाने शब्द वाढत आहेत, एकाने आरे म्हटलं की दुसऱ्याने कारे म्हणायचं. यातून वाद खालपर्यंत पोहचत आहेत. त्यामुळं त्यांना एकमेकांचे शत्रू वाटू लागतात. आपापल्या भूमिका सांगण्याचं कार्यक्रम झाला की राजकीय जोडे बाजूला ठेऊन, सलोख्याच्या भावनेनं पाहायला हवं” अशीही प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.

हेही वाचा…एकनाथ शिंदे शिवसेना पक्षप्रमुख पदावर दावा करणार?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मी सभागृहात बोलतानाच एकनाथ शिंदेंना बोलून हे वाद मिटविण्याचे प्रयत्न केले. मात्र अद्याप हे वाद सुरूच आहेत. परंतु कोणताही वाद फार काळ टिकत नाही, त्यातून कटुता कमी होईल आणि जनतेसमोर हे दोघे जातील. उदाहरणार्थ १३ नोव्हेंबरला जी पोटनिवडणुक आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निकालाकडे लक्ष लागून आहे. चिन्हं गोठवलं जाणार, नाही गोठवलं तर कोणाला मिळणार असे अनेक प्रश्न आहेत. आमच्या बाबतही १९९९ साली असंच घडलं होतं. काँग्रेसलाही अनेक चिन्हं घेऊन निवडणुका लढायला लागल्या. तेव्हा चिन्हं गावागावात पोहचवणे कठीण व्हायचं, पण आता तंत्रज्ञानामुळं प्रत्येक चिन्हं घराघरात पोहचते. त्यामुळे भविष्यात धनुष्यबाण हे चिन्हं नसलं तरी कोणताही फटका शिवसेनेला बसणार नाही” असंही अजित पवार यांनी सांगितले.