शरद पवारांनी नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत राज्यातील विधानसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलेल्या प्रचाराचे कौतुक केलं. यावरून आता अजित पवारांचे कट्टर समर्थक आणि आमदार अण्णा बनसोडे यांनी शरद पवारांनी अजित पवारांचं कौतुक करायला हवं, असं म्हणत खंत व्यक्त केली आहे. आमदार बनसोडे हे पिंपरीमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा >>> नदीचे पाणी वाहून जाण्यासाठी अडथळा ठरणारे बंधारे पालिका का काढणार, हे आहे कारण !

अण्णा बनसोडे म्हणाले, शरद पवारांचा आजही आम्हाला आदर आहे. त्यांनी गेल्या ४० ते ५० वर्षांपासून पक्ष बांधणी केली आहे. शरद पवारांनी जे वक्तव्य केलं ते मी ऐकलं आहे. त्यावरून मी एवढेच म्हणेन की, अजित पवारांनीदेखील संघटनात्मक काम केल आहे. कमी वेळेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ४१ आमदार निवडून आणले आहेत, त्यामुळे शरद पवारांनी अजित पवारांचं कौतुक करायला हवं. शरद पवारांनी अजित पवारांचं कौतुक केलं असतं तर सर्वांना आवडलं असतं. असं म्हणत आमदार अण्णा बनसोडे यांनी खंत व्यक्त केली आहे. तसेच, आगामी महानगरपालिका अजित पवारांच्या नेतृत्वाखाली स्वबळावर लढणार असल्याचा नारादेखील अण्णा बनसोडे यांनी दिला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा >>> वैकुंठात असुविधा, भटक्या श्वानांचाही त्रास, नक्की काय आहे प्रकार?

नेमकं शरद पवार काय म्हणाले होते.? राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीत नुकत्याच पार पडलेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलेल्या प्रचाराचे शरद पवार यांनी कौतुक केलं. तसेच विधानसभा निवडणुकीत विरोधकांना घवघवीत यश मिळण्यामध्ये संघाच्या कामाचा मोठा वाटा असल्याची कबुलीही पवार यांनी दिली आहे.