पुणे शहरातील मुंढवा केशवनगर भागातील पुलाच्या कामाची पाहणी उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास केली. त्यावेळी पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम,अप्पर पोलीस आयुक्त वाहतूक मनोज पाटील यांच्यासह अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मुंढवा केशवनगर भागातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी या पुलाचे काम लवकरात लवकर करा,अशा सूचना देखील अजित पवार यांनी यावेळी अधिकारी वर्गाला त्यांनी केल्या.
आम्ही कोटय़वधी रुपयांचे फ्लॅट विकत घेतले आहेत.पण आम्हाला बिल्डरकडून कोणत्याही प्रकाराच्या सुविधा दिल्या जात नाही.पाणी विकत घ्यावे लागते,या ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. तसेच या भागात दारू विक्रीच्या दुकानाच्या आसपासच्या भागात नागरिक दारू पीत बसतात. त्यामुळे त्या परिसरातमधून जाताना आणि येताना त्रास सहन करावा लागतो. यासह अनेक तक्रारीचा पाढा स्थानिक नागरिकांनी अजित पवार यांना वाचून दाखवला, त्यावर अजित पवार म्हणाले, जर बिल्डरला एवढी मस्ती आली असेल तर आपण ॲक्शन घ्या, त्याचं काम बंद करा. आपण या अगोदर पण अशा घटनांमध्ये कारवाई केल्याचे त्यांनी सांगितले.
दारू विक्रीच्या प्रश्नावर ते पुढे म्हणाले, ते दुकान कोणाचेही असू द्या, माझ्याकडे सगळे अधिकार असून तुम्ही कारवाई करण्याची वेळ आणू देऊ नका, तुम्ही शहाणे बणा आणि लगेच सगळ बंद करा, याबाबत त्या संबधित दुकानादाराला सांगा, तुम्हाला जे विक्री करायचे ते करा, ज्याला घ्यायचे आहे. तो घेईल आणि तो घरात काय पियाचे ते नियमांने पीत बसेल, असे अजित पवार म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.