पुणेरी पाट्यांची चर्चा देशभरात होत असते. त्याचसोबत पुण्यातल्या देवांची, मंदिरांची नावं हाही चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय नेहमीच ठरत असतो. नुकतंच पंतप्रधान मोदी यांचं मंदिरही पुण्यातच उभारण्यात आलं होतं. पुण्याच्या याच गोष्टींचं कौतुक पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही असल्याचं आज त्यांनी बोलून दाखवलं. हे बोलतानाच त्यांनी यावर त्यांच्या खास शैलीत मिश्किल टिप्पणीही केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे तिथे काय उणे हे म्हटलं जातं, ते खरं आहे. कारण आपल्या पुणेरी पाट्यांबद्दल नेहमीच सर्वांना कुतुहल असते आणि त्याची चर्चा सर्वत्र पाहण्यास मिळते. त्यामुळे खरोखरच पुणेकरांचा हात कुणी धरू शकत नाही. ज्या भागात आज भूमिपूजन होत आहे, या भागाला डुक्कर खिंड असं म्हटलं जातं. या भागात काही वर्षांपूर्वी रानडुकरांचा वावर जास्त असल्यामुळे असं नाव पडलं आहे, असे म्हणत अजित पवार यांनी यावेळी शहरातील काही मंदिरांची नावे दाखवली. ते आपल्या मिश्किल शैलीत म्हणाले, “पुणेकरांनी नाव ठेवण्यात देवानाही सोडलं नाही”. त्यांच्या या विधानानंतर कार्यक्रमाच्या ठिकाणी एकच हशा पिकला.

हेही वाचा – भाजपाच्या ‘महाविकास आघाडी सरकारची कामे दाखवा आणि बक्षीस मिळवा’ मोहिमेवर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले..

वन विभागाच्या 35 एकर जागेमध्ये भव्य संजीवन उद्यानाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी अजित पवार बोलत होते. यावेळी वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष नगरसेवक प्रशांत जगताप यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar talks about puneri patya and unique names of gods and temples in pune vsk 98 svk
First published on: 20-08-2021 at 09:54 IST