पुणे : अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून (एआयसीटीई) तीन वर्षांच्या खंडानंतर आता नव्या अभियांत्रिकी महाविद्यालये सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासह काही नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. तसेच प्रादेशिक कार्यालये बंद करून आता संपूर्ण मान्यता प्रक्रिया राष्ट्रीय पातळीवर एक खिडकी पद्धतीने राबवली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 शैक्षणिक वर्ष २०२३-२४ या वर्षासाठी मान्यता प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) माहितीपत्रक प्रसिद्ध केले. घटत्या विद्यार्थिसंख्येमुळे नव्या महाविद्यालयांबाबत एआयसीटीईने गेली तीन वर्षे निर्बंध घातले होते. मात्र आता शैक्षणिक वर्ष २०२३-२४साठी मान्यतेच्या निकषांमध्ये शिथिलता आणल्याने आता पुन्हा एकदा संस्थांना नवे महाविद्यालय सुरू करण्यासाठीचा अर्ज करता येणार आहे. त्याशिवाय मान्यता प्रक्रिया सुलभ होण्यासाठी स्वतंत्र संकेतस्थळाची निर्मिती करण्यात येणार आहे. महाविदयालये, उच्च शिक्षण संस्थांना या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे. याच संकेतस्थळाद्वारे एक खिडकी पद्धतीने मान्यता प्रक्रिया राबवण्यात येईल. मान्यता प्रक्रिया केंद्रीय पातळीवर होणार असल्याने  देशभरातील प्रादेशिक कार्यालये बंद करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: All india technical education council encourage to start new engineering colleges pune print news ccp14 zws
First published on: 25-03-2023 at 05:04 IST