मटार, पालक, गाजर, मुळा, टोमॅटो, लसूण, बटाटे, कणीस यासह विविध भाज्या तसेच फळांपासून श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरात आरास करण्यात आली होती. विविध प्रकारच्या भाज्यांनी सजलेले मंदिरातील खांब, विविधरंगी फळांचे तोरण आणि कळसापासून पायथ्यापर्यंत लावलेला ऊस असे मनोहारी दृश्य भाविकांना पहायला मिळाले.

हेही वाचा- पुणे : पवन हाडोळे, वरुण भागवतचे ‘आइस क्लाइंबिंग’मध्ये यश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शाकंभरी पौर्णिमेनिमित्त बुधवार पेठेतील श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त श्री दत्तमंदिरामध्ये ३५ प्रकारची फळे आणि भाज्यांचा वापर करुन आरास साकारण्यात आली. श्री म्हसोबा देवस्थान खारावडेच्या अध्यक्षा मधुरा आणि मुकुंद भेलके यांच्या हस्ते सजावटीचे अनावरण झाले. श्री अक्कलकोट स्वामी महाराज संस्थानचे विश्वस्त रवींद्र शेडगे, सेवा मित्र मंडळाचे शिरीष मोहिते, दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. प्रताप परदेशी, कार्यकारी विश्वस्त अॅड.शिवराज कदम जहागिरदार, खजिनदार महेंद्र पिसाळ, उत्सवप्रमुख अॅड.रजनी उकरंडे, उत्सव उपप्रमुख युवराज गाडवे, विश्वस्त सुनिल रुकारी, डॉ.पराग काळकर, राजू बलकवडे, अक्षय हलवाई आदी उपस्थित होते. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपव्यवस्थापक (प्रशासन) समीर आणि गीता रजपूत यांच्या हस्ते दत्तयाग पार पडला मंदिरात सकाळपासून भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती.