अभिजात गायकीच्या सुरांचं लेणं घेऊन रसिकांवर अधिराज्य करणारे किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक आनंद भाटे यांच्याशी  शुक्रवारी (३ जुलै) संवाद साधण्याची संधी लाभणार आहे. ‘लोकसत्ता’च्या ‘सहज बोलता बोलता’ उपक्रमात भाटे यांच्याशी ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक आणि संगीत अभ्यासक पं. अमरेंद्र धनेश्वर गप्पा मारणार आहेत. सायंकाळी पाच वाजता हा वेब संवाद रंगणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शालेय जीवनामध्ये बालगंधर्व यांची नाटय़पदे सादर करणाऱ्या आनंद भाटे यांचा ‘आनंद गंधर्व’ या उपाधीने सन्मान करण्यात आला होता.  किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांच्या मार्गदर्शनाने आनंद भाटे यांच्या स्वरांना पैलू पाडले गेले.  कोणत्याही संगीत मैफिलीमध्ये त्यांना मराठी अभंगांबरोबरच ‘भाग्यदा लक्ष्मी बारम्मा’ या पंडितजींनी आपल्या अजरामर सुरांनी लोकप्रिय केलेल्या संत पुरंदर दास यांच्या कन्नड भजन गायनाची श्रोत्यांकडून फर्माईश येत असते.संगीत रंगभूमीचे नटसम्राट बालगंधर्व यांच्यावरील चरित्रपटामध्ये रुपेरी पडद्यावरील बालगंधर्व यांच्या नाटय़पदांना  भाटे यांचा स्वर लाभला होता.

सहभागी होण्यासाठी.. https://tiny.cc/LS_SahajBoltaBolta_3July  लिंकवर जाऊन नोंदणी करा.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anand bhate on friday in loksatta sahaj bolta bolta event abn
First published on: 02-07-2020 at 00:26 IST