भाजपाने कसबा पोटनिवडणुकीसाठी दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबियांपैकी कोणालाही उमेदवारी न देता हेमंत रासने यांना उमेदवारी दिली. कुटुंबीयांपैकी कोणालाही संधी न दिल्याने शैलेश टिळक यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर अनेक घडामोडींना वेग आला आहे. हिंदू महासंघ संघटनेचे आनंद दवे यांनी सोमवारी शैलेश टिळक यांची भेट घेतली होती. यानंतर त्यांनी आपण कसबा पोटनिवडणुकीसाठी उद्या उमेदवारी दाखल करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आज (मंगळवारी) दवेंनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे.

हेही वाचा- Chinchwad By-Election : “शिवसैनिक माझ्याबरोबर…” म्हणत अपक्ष उमेदवारी दाखल करण्यावर राहुल कलाटे ठाम!

कसबा मतदारसंघात अनेक समस्या आहेत. त्या येत्या काळात सोडविले जाणार असून त्यातील मुख्य म्हणजे पुण्यश्वर मुक्त करायच आहे. या पोटनिवडणुकीत दोन नगरसेवक आहेत. ते २० वर्ष नगरसेवक होते. ते आताच्या निवडणुकीत आश्वासन देत आहे. यापुढे देखील देतील. ते दोघे नगरसेवक असताना कसबा मतदार संघातील विकास का केला नाही. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही उमेदवारांनी चर्चेसाठी येण्याचे आव्हान हिंदू महासंघ संघटनेचे आनंद दवे यांनी हेमंत रासने आणि रविंद्र धंगेकर यांना दिले आहे. आम्ही या निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने निवडून येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा- कसबा पोटनिवडणूक : “काँग्रेस पक्षाने माझ्यावर अन्याय केला”; बाळासाहेब दाभेकर यांचा आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली. त्यानंतर आज भाजपाकडून हेमंत रासने यांनी तर महाविकास आघाडीकडून रविंद्र धंगेकर यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत काल उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर हिंदू महासंघ संघटनेचे आनंद दवे यांनी कसबा विधानसभा पोट निवडणुकीचा अर्ज भरला आहे.