महाराष्ट्र शासनाच्या भाषा सल्लागार समितीवर अशासकीय सदस्य म्हणून मराठी भाषा अभ्यासक अनिल गोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मराठी भाषेच्या विकासासाठी राज्य शासनाकडून भाषा सल्लागार समिती काम करते. अनिल गोरे हे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी अनेक वर्षे कार्यरत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गोरे यांच्या नियुक्तीसाठी शासनाकडे शिफारस केली होती. ‘‘मिळालेल्या संधीचा मी अधिकाधिक उपयोग करीन. ही समिती अनेक चांगले उपक्रम राबवत असते. त्यांना अधिकाधिक प्रसिद्धी मिळावी यासाठीही प्रयत्न करणार आहे,’’ असे गोरे यांनी सांगितले.