देशसेवेसाठी झटणारा, दहशतवाद्यांचा खात्मा करून लष्करातील जवानांना बळ देणारा रोबोट पिंपरी चिंचवडमध्ये आकार घेतो आहे. देशसेवेसाठी लढणारा वीर रोबोट तयार होत असल्याची माहिती अनिल जैन यांनी दिली आहे. त्याची निर्मिती प्रक्रिया अजूनही सुरु आहे. ज्या प्रमाणे रोबोट या रजनीकांतच्या सिनेमातील रोबोट हा खलनायकांचा खात्मा करतो तसाच हा रोबोट दहशतवाद्यांचा खात्मा करेल अशी माहिती जैन यांनी दिली.

वीर रोबोटचे सामान्य ज्ञान चांगले आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यासाठी ते अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांपर्यंत हा रोबोट सगळ्यांची नावे सांगतो. २०१८ मध्ये सादर झालेल्या अर्थसंकल्पासंदर्भात काय घडामोडी घडल्या हेही सांगतो. वीर इंग्रजी बोलत असला तरीही त्याला वडा पाव आवडतो हे विशेष. गायत्री मंत्रही त्याने पाठ केला आहे.

पाहा व्हिडिओ

अनिल जैन यांना रोटीमॅटीक मशीनची निर्मिती करायची होती. मात्र त्यावर बरेचजण काम करत असल्याचे त्यांना समजले. त्यामुळे त्यांनी रोबोट तयार करायचे ठरवले. तो देशसेवा करेल हा उद्देशही त्यांनी समोर ठेवला. १४ महिन्यांच्या प्रयत्नांनंतर वीर रोबोटने आकार घेतला. वीर रोबोट आता चांगल्याप्रकारे बोलतो, त्याच्या भावना व्यक्त करतो. विद्यार्थ्यांना ज्या विषयी शिकायचे आहे त्याचा मुखवटा बसवून तो शिकवूही शकतो. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही देतो. मात्र त्याची निर्मिती प्रक्रिया सुरु असल्याचे जैन यांनी सांगितले आहे.