पुणे : कल्याणीनगर अपघातानंतर दुसरा मोठा अपघात खराडी जुना जकातनाका येथे घडला. नगर रस्त्यावर खराडी जकात नाका येथे भरधाव ट्रकने दुचाकीवरील दोन महाविद्यालयीन तरुणांना धडक दिली. अपघातात महाविद्यालयीन तरुण आदिल शेख आणि त्याच्या मित्राचा मृत्यू झाला. अपघातात एकजण गंभीर जखमी झाला आहे. सोमवारी रात्री दहाच्या सुमारास अपघात घडला.

अपघातात मृत्युमुखी पडलेले तरुण वाघोली येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत होते. ते मूळचे लातूर येथील उदगीरचे आहेत. अपघातात एकजण गंभीर जखमी असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

jalgaon students russia, jalgaon students
रशियातील नदीत बुडालेल्या जळगावच्या विद्यार्थ्यांचा शोध सुरु, आईने पाण्यातून बाहेर पडण्यास सांगितले, पण…
Pimpri Chinchwad Municipal Corporation, pcmc halts DBT Scheme, School Supplies Switches to Supplier Tender, pimpri news, school news,
पिंपरी : महापालिकेचा ‘डीबीटी’ला हरताळ!
Mumbai university ba result marathi news
मुंबई: ‘बी.ए.’च्या ६ व्या सत्र परीक्षेमध्ये ४९.३१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, ५०.६९ टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण
Om Orthopedic Hospital,
कोल्हापुरातील ओम ऑर्थोपेडिक हॉस्पिटलला दणका; जैव वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकल्याने ५० हजारचा दंड
karan singh
ब्रिजभूषण सिंहांच्या मुलाच्या ताफ्यातील वाहनाची दुचाकीला धडक, दोघांचा मृत्यू; तरुणांकडून चक्काजाम!
hijab
“हिजाब घातल्यावर नोकरी कोण देईल?”, मुंबईतील महाविद्यालय हिजाब बंदीवर ठाम!
question paper, late, law students,
विधि शाखेच्या विद्यार्थ्यांच्या हाती एक तास उशिरा प्रश्नपत्रिका, मुंबईतील न्यू लॉ महाविद्यालयातील प्रकार
Solapur crime news, professor dance in dance bar
डान्सबारमध्ये नाचणाऱ्या प्राध्यापकाचा दोन लाखांच्या खंडणीसाठी छळ, पाचजणांच्या टोळक्याविरूध्द गुन्हा दाखल

हेही वाचा – पुण्यातील ख्यातनाम नूमवि प्रशालेत होणार मोठा बदल….

मालवाहतूक करणारा ट्रक वाघोलीतून पुण्याकडे येत असताना खराडी जुना जकातनाका येथे अपघात घडला. याप्रकरणी ट्रक ड्रायव्हरला ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. श्यामबाबू रामफळ गौतम असे चालकाचे नाव आहे.

हेही वाचा – “मी शांत बसणार नाही, सगळ्यांना उघडं पाडेन”, पोर्श कार अपघात प्रकरणी आरोपीच्या नमुन्यात फेरफार करणाऱ्या डॉक्टरची धमकी!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक चालक शामबाबू गौतम हा वाघोलीहून चंदननगरकडे जात होता. जकात नाका येथे सिग्नलवर थांबलेल्या दुचाकीला ट्रकने मागून जोरात धडक दिली. त्यामध्ये दुचाकीवर असणारे तीनजण फरफटत गेले. अपघातात दोनजणांचा मृत्यू झाला.