पुणे : लष्कर भागातील रोझरी एज्युकेशन ग्रुपचे संचालक विनय आरहाना आणि त्यांचे बंधू विवेक आरहाना यांची ४७ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता सक्त वसुली संचालनालयाकडून (ईडी) जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेत लष्कर भागातील रोझरी स्कूलची वास्तू तसेच आरहाना यांच्या मालकीची जमिनीचा समावेश आहे. आरहाना यांच्या एकूण चार मालमत्ता जप्त करण्यात आल्या असून मालमत्तांचे बाजारमूल्य ९८ कोटी २० लाख  रुपये एवढे आहे.

रोझरी स्कूलचे संचालक विनय आरहाना, विवेक आरहाना यांच्या विरुद्ध काॅसमाॅस बँकेची २० कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल झाला होता. याबाबत बँकेचे अधिकारी शिवाजी काळे यांनी यांनी फिर्याद दिली होती. आरहाना यांनी बँकेकडून कर्ज घेतले हाेते. कर्जाची परतफेड करण्यात न आल्याने बँकेकडून फसवणुकीची तक्रार देण्यात आली होती. आरहाना यांनी शाळेच्या नूतनीकरणासाठी काॅसमाॅस बँकेकडून २० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते.

हेही वाचा >>> पुणे : संपात शहरासह जिल्ह्यातील ६८ हजार शासकीय कर्मचाऱ्यांचा सहभाग

शाळेच्या नूतनीकरणासाठी कर्जाची रक्कम वापरणे अपेक्षित असताना आरहाना यांनी या रकमेचा अपहार केला. नूतनीकरणासाठी बनावट निविदा मागविण्यात आल्या होत्या. या प्रकरणी आरहाना यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर ‘ईडी’कडून समांतर तपास करण्यात आला होता. ‘ईडी’ने २८ जानेवारी रोजी आरहाना यांच्या मालमत्तेवर छापे टाकून त्यांची चौकशी करण्यात आली हाेती. त्यानंतर  ‘ईडी’कडून विनय आरहाना यांना दहा मार्च रोजी अटक करण्यात आली होती. मुंबईतील विशेष न्यायालयाने आरहाना यांना ‘ईडी’ कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते.

हेही वाचा >>> पुणे : म्हाडाच्या प्रकल्पांना गती द्या, उपमुख्यमंत्री फडणवीस यांची सूचना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘ईडी’कडून विनय आणि विवेक आरहान यांच्या पुण्यातील चार मालमत्ता जप्त करण्यात आल्या. जप्त करण्यात आलेल्या चार मालमत्तेचे मूल्य ४७ कोटी एक लाख रुपये एवढे आहेत. आरहाना यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या चार मालमत्तांचे बाजारमूल्य ९८ कोटी २० लाख रुपये आहे. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेत लष्कर भागातील रोझरी शाळेची वास्तू तसेच आराहाना यांच्या मालकीची जमिनीचा समावेश आहे, असे ‘ईडी’कडून कळविण्यात आले आहे.