पिंपरी- चिंचवड : स्पर्धा परीक्षेत यश खेचून आणणारी खेडच्या अश्विनी केदारीच नुकतंच अंगावर उकळत पाणी पडून उपचारादरम्यान मृत्यू झाला. अश्विनीला डीवायएसपी किंवा जिल्हाधिकारी व्हायचं होत. जानेवारीत अश्विनी पोलीस उपनिरीक्षकच्या प्रशिक्षणासाठी जाणार होती. परंतु, नियतीला काही वेगळच मान्य होत. अश्विनी केदारी संबंधी अधिकची माहिती मेहुणे (भाऊजी) सोमनाथ बच्चे यांनी दिली आहे.
नेमकं त्या दिवशी काय घडलं?
सोमनाथ बच्चे यांनी सांगितलं. गणपतीच्या तिसऱ्या दिवशी ही घटना घडली आहे. अश्विनीचे दोन्ही भाऊ कंपनीत नोकरी करतात. त्यांना सकाळी लवकर जायचं असल्याने पाणी गरम करण्यासाठी प्लास्टील ड्रममध्ये असलेलं हिटर (५०-६० लिटरच) सुरू केलं. एक तासाने बंद करून कोमट झालेलं पाणी सकाळी वापरता येईल हा तिचा उद्देश होता. परंतु, अश्विनी अभ्यास करत असताना झोपी गेले आणि पहाटे तीन ला जाग आली. तोपर्यंत हिटर सुरूच होत. पाणी उकळत होत. अश्विनीने बटन बंद केलं आणि त्यामधून पाणी घेण्यासाठी ड्रमच झाकण उघडलं. तेवढ्यात उकळत पाणी अंगावर उडालं आणि घसरून खाली पडली. इतर पाणी देखील तिच्यावर अंगाखाली आलं, ती ८० टक्के भाजली गेली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचार सुरू झाले. परंतु, अकरा दिवसानंतर पिंपरीतील डीवायपाटील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
अश्विनीच शिक्षण कुठं झालं?
खेडमधील पाळू येथे पहिले ते दहावी अश्विनीच शिक्षण झालं. मग, ११ वी आणि १२ वी खेडमध्ये झाली. पुढील शिक्षण पुण्यात घेतलं. ती मॅकेनिकल इंजिनिअर होती. पुढे तिने स्पर्धा परीक्षेची तयारी केली त्यात तिला यश ही आलं. तिला डीवायएसली किंवा जिल्हाधिकारी व्हायचं होत. अश्विनीला दहावीत ९३ टक्के गुण मिळाले होते. ती शाळेतील टॉपर होती.
परिस्थिती सुधारणार होती पण नियतीला काही वेगळं…
अश्विनी केदारी कुटुंबाला चांगले दिवस येणार होते. कुटूंबात सरकारी नोकरी असलेली ती पहिलीच. अवघ कुटुंब आनंदी होत. परंतु, हा आनंद फार काळ टिकला नाही. जानेवारी महिन्यात पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी असलेल्या प्रशिक्षणासाठी जाण्याआधी तीच अस दुखत निधन झालं आहे.