लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : पोलीस आयुक्तालयातील सहायक फौजदाराच्या मुलाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत यशाला गवसणी घातली. शुभम भगवान थिटे असे यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सहायक फौजदाराच्या मुलाचे नाव आहे. त्याच्या या यशाने पोलीस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची मान अभिमानाने उंचावली आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

थिटे कुटुंब मूळचे शिरूर तालुक्यातील केंदूर-पाबळ गावचे. शुभमचे वडील भगवान हे पुणे शहर पोलीस दलात कार्यरत होते. १९९३ पासून वाकड पोलीस वसाहतीमध्ये थिटे कुटुंब वास्तव्यास आहे. २०१८ मध्ये स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची निर्मिती झाल्यानंतर भगवान थिटे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात वर्ग झाले. सध्या ते विशेष शाखेत कार्यरत आहेत. थिटे यांच्या पत्नी वनिता या गृहिणी आहेत.

आणखी वाचा-एमआयएमकडून पुणे लोकसभेसाठी माजी नगरसेवक अनिस सुंडके यांना उमेदवारी जाहीर

आपल्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाकडे प्राधान्याने लक्ष देत थिटे यांनी त्यांना उच्च शिक्षण दिले. संगणक अभियंता असलेली त्यांची मोठी मुलगी स्नेहल हिंजवडीतील माहिती तंत्रज्ञान नगरीतील नामांकित कंपनीत नोकरीला आहे. तर, मुलगा शुभमने अभियांत्रिकीची पदवी संपादन केली. भारतीय प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न उराशी बाळगत तो गेल्या सहा वर्षांपासून यूपीएससी परीक्षेचा अभ्यास करीत होता. करोना प्रादूर्भावामुळे दोन वर्षे परीक्षा झाली नाही. तर, चार वेळा आलेल्या अपयशाने खचून न जाता शुभमने पाचव्यांदा यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. जोमाने अभ्यास करीत शुभमने यशाला गवसणी घातली. या परीक्षेत उत्तीर्ण होत शुभमने ३५९ वी रँक मिळविली. मुलाच्या या यशाने भगवान थिटे यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. मुलाचे अभिनंदन करताना आपले आनंदाश्रू त्यांना आवरता आले नाहीत.

Story img Loader