scorecardresearch

रिक्षावर झाड कोसळून चालकाचा मृत्यू

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तसेच येरवडा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

रिक्षावर झाड कोसळून चालकाचा मृत्यू
प्रतिनिधिक छायाचित्र

पुणे : मुसळधार पावसामुळे रिक्षावर झाड पडल्याने चालकाच्या मृत्यू झाल्याची घटना येरवड्यातील रामनगर परिसरात शुक्रवारी सायंकाळी घडली.जगदीशसिंह संगर (वय ६०, रा. रामनगर) असे मृत्युमुखी पडलेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. शहरात शुक्रवारी (३० सप्टेंबर) मुसळधार पाऊस झाला.. येरवड्यातील रामनगरमधील राम मंदिर परिसर येथे धावत्या रिक्षावर पिंपळाचे झाड कोसळले.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तसेच येरवडा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रिक्षावर पडलेले झाड काढण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या जगदिशसिंह यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे यांनी दिली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या