पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास विभागातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वोत्कृष्ट ग्रंथ, सर्वोत्कृष्ट कार्यकर्ता आणि सर्वोत्कृष्ट संशोधक या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यात सर्वोत्कृष्ट ग्रंथासाठी डॉ. योगिराज बागुल, सर्वोत्कृष्ट कार्यकर्ता म्हणून डॉ. चित्रा कुऱ्हे आणि सुभाष वारे, तर डॉ. मिलिंद आवाड यांना संशोधनासाठीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 विद्यापीठाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. २१ एप्रिल रोजी प्रा. केविन ब्राउन आणि श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येतील. या वेळी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार उपस्थित राहणार आहेत. माजी कुलगुरू प्रा. नागनाथ कोत्तापल्ले, नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडीजचे माजी प्रमुख प्रा. प्रदीप आगलावे, कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख डॉ. कृष्णा महाजन, मुंबई विद्यापीठाच्या आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख डॉ. अनिल कुमार फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास विभाग प्रमुख डॉ. विजय खरे यांच्या निवड समितीने पुरस्कारार्थीची निवड केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Award announced pune university books activists researchers awards announcement ambedkar studies department ysh
First published on: 14-04-2022 at 00:08 IST