पुणे जिल्ह्यामधील शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेमध्ये भरदिवसा पाच जणांनी दरोडा टाकल्याची खळबळजनक घटना आज (गुरूवार) घडली. दरोडेखोरानी सोने आणि रोख रक्कम अशी मिळून १ कोटीहून अधिकची लूट केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे ग्रामीण अधीक्षक अभिनव देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेमध्ये दुपारी दीड वाजेच्या सुमारास १० ते १५ ग्राहक बँकेत होते. त्यावेळी चारचाकी वाहनातून पाच जण बँकेत आले. त्यातील एक जण बँकेच्या दारात थांबला, इतर चौघांनी मॅनेजर आणि कॅशियरला बंदुकीचा धाक दाखवून, त्यांच्याकडून लॉकरच्या चाव्या घेतल्या. त्यानंतर त्यांनी रोख रक्कम आणि सोने बॅगेत भरले आणि काही मिनिटात ते सर्वजण चारचाकी वाहनातून पसार झाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bank robbery at pimparkhed in shirur taluka of pune district msr 87 svk
First published on: 21-10-2021 at 17:59 IST