पिंपरी चिंचवड : हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांचा जगातील सर्वांत उंच पूर्णाकृती पुतळा उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या काळात राज्यातील शिव-शंभू प्रेमी युवकांचे प्रेरणास्थान म्हणून नावारुपाला येणाऱ्या या ‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’’ चे पाद्यपूजन आज विधीवत करण्यात आले.

भारतीय जनता पार्टीचे आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून बोऱ्हाडेवाडी- मोशी येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा जगातील सर्वांत उंच पुतळा उभारण्याचे काम सुरू आहे. या पुतळ्याच्या चौथऱ्याचे काम झाले आहे. त्यामुळे पुतळा ज्या ठिकाणी उभारला जाणार आहे त्या ठिकाणी पाद्यपूजन करण्यात आले. यावेळी मोशी-बोऱ्हाडेवाडीतील ग्रामस्थ यांच्यासह शिव-शंभू विचारांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार महेश लांडगे म्हणाले की, ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ अर्थातच छत्रपती संभाजी महाराज यांचा सर्वात उंच पुतळा उभारण्याचे भाग्य लाभले, याचे समाधान वाटते. पिंपरी-चिंचवडकरांसह संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटेल, असा भव्य पूर्णाकृती पुतळा साकारत आहे. शंभू सृष्टीसुद्धा आहे. हा पुतळा हिंदू धर्म आणि संस्कृती संरक्षणाची कायम प्रेरणा देत राहील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

असा आहे ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’

  • छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याची १४० फूट उंची
  • चौथऱ्यांची उंची ४० फूट
  • सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा पुतळा १० फूट
  • सरदार आणि मावळे एकूण १६ पुतळे प्रत्येकी १० फूट
  • ओपन एअर थिएटर, प्रमुख प्रसंगांवर आधारित ब्राँझ म्यूरल्स
  • शंभुराजांची गाथा ऐकण्यासाठी एलईडी स्क्रीन
  • चलचित्र, प्रकाश योजना, हॉलोग्राफिक प्रेझेंटेशन व्यवस्था.