पुणे : भरधाव मोटारीच्या धडकेने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना कोथरूडमधील गुजरात कॉलनीत घडली. अनिकेत अशोक गायकवाड (वय २५, रा. संकुराज सोसायटी, संगम चौक, कोथरूड) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. या प्रकरणी मोटारचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिकेतचा भाऊ अमित (वय ३१) याने या संदर्भात कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकीस्वार अनिकेत कोथरूडमधील गुजरात कॉलनी परिसरातून पहाटे तीनच्या सुमारास निघाला होता. त्या वेळी सुंदरनगरी सोसायटीसमोर भरधाव मोटारीने दुचाकीस्वार अनिकेतला धडक दिली. अपघातानंतर मोटारचालक पसार झाला.

हेही वाचा – विद्यार्थ्यांना दिलासा, केंद्रीय संस्थांतील प्रवेशासाठी ७५ टक्के गुण अनिवार्यतेबाबत एनटीएकडून अंशतः बदल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गंभीर जखमी झालेल्या अनिकेतचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. पसार झालेल्या मोटारचालकाचा शोध घेण्यात येत असून सहायक पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण तपास करत आहेत.