शिरूर-भीमाशंकर राज्य महामार्गावर दुचाकी आणि कारच्या अपघातामध्ये तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अनिल जठार असे मृत तरुणाचे नाव आहे. शनिवारी सकाळी धुओली गावाजवळ हा अपघात झाला. कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिरूर ते भीमाशंकर या राज्यमार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. धुओली गावाजवळ खड्डे चुकवण्याचा प्रयत्नात कार चालक आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. अपघातानंतर स्थानिकांनी जखमी अवस्थेतील अनिलला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच राजगुरूनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कार चालकाला ताब्यात घेतले आहे.

राज्यातील वाढत्या अपघातामध्ये खड्डे भर घालत आहेत. या अपघातानंतर खड्डे बुजवण्याचा सरकारचा दावा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. भीमा शंकर हे एक प्रेक्षणीय स्थळ असून रस्त्यावरील खड्ड्यांमुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे, सरकारने हा मुद्दा लक्षात घेऊन खेड्डे बुजवण्याचे आश्वासन पूर्ण करावे, अशी प्रतिक्रिया स्थानिकांतून उमटताना दिसते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Biker died accident on bhimashankar shirur road
First published on: 02-12-2017 at 19:28 IST