काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल वादग्रस्त विधान केले. या विधानाचे पडसाद राज्यभरात उमटताना दिसत असून भाजपा मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाली आहे. “नाना आपण पुण्यात कधी येताय, ते सांगा आम्ही आपल्या स्वागताला उत्सुक आहोत, ( आम्ही स्वागत कसे करतो, ते आपले सहकारी पक्षातील मित्र असणार्‍या जितूदीनुला विचारा)” त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील भाजपाचे नगरसेवक धीरज घाटे यांनी अशा मजकूरचा फलक लावून इशारा दिला आहे.

“जे मोदी फसवणूक करुन या देशातून पळाले त्याबद्दल..”; मोदींवरील वक्तव्यानंतर नाना पटोलेंची प्रतिक्रिया

या बाबत धीरज घाटे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, “ज्या पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्था ते लोकसभेत सपाटून मारा खावा लागला आहे. अशा काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे नेतृत्व करीत आहे. त्यामुळे अशा व्यक्ती बद्दल काय बोलावे आणि ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल विधान करतात. त्या विधानाचा मी निषेध व्यक्त करतो. नाना पटोले यांच्यावर राज्य सरकारने त्वरित कारवाई केली पाहिजे. तसेच त्याही पुढे जाऊन, नाना पटोले यांनी नाना आपण पुण्यात कधी येताय, ते सांगा आम्ही आपल्या स्वागताला उत्सुक आहोत,” असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे.

“असा कुणी गावगुंड खरंच असेल तर नाना पटोलेंनी…”, मोदींवरील वादग्रस्त वक्तव्यावर भाजपाचा हल्लाबोल

नाना पटोले काय म्हणाले –

‘‘मी एवढय़ा वर्षांच्या राजकारणात एकही शाळा काढली नाही किंवा ठेकेदारी केली नाही. जो आला, त्याला वाटत गेलो, म्हणूनच मोदींना मारू शकतो, शिवी देऊ शकतो. म्हणून मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आले नाही,’’ असं नाना पटोले म्हणाले. नाना पटोले यांच्या या वक्तव्यावर भाजपाकडून निषेध व्यक्त केला जात आहे. देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील नाना पटोलेंच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला आहे.

नाना पटोलेंच्या मोदींसंबंधी ‘त्या’ वक्तव्यावर बोलणं संजय राऊतांनी टाळलं; म्हणाले….

फडणवीसांकडून टीका

भाजपा नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत पटोलेंच्या विधानाचा समाचार घेतला. पंजाबमध्ये पाकिस्तानच्या सीमेलगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाहनाचा ताफा २० मिनिटे खोळंबून राहतो, पण तेथील काँग्रेसचे मुख्यमंत्री साधी दखलसुद्धा घेत नाहीत. आता महाराष्ट्राचे काँग्रेस अध्यक्ष मी मोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो.. असं विधान करतात. काँग्रेस पक्षाचे चालले तरी काय? कधी काळी स्वातंत्र्याच्या आंदोलनात असणारा हा पक्ष इतक्या रसातळाला गेला. काँग्रेसला आता लोकशाहीतील राजकीय पक्ष म्हणायचे की दहशत पसरवणारी संघटना, असा सवाल फडणवीस यांनी केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गडकरीही संतापले –

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीदेखील नाना पटोलेंच्या वक्तव्यावरुन नाराजी जाहीर करत ट्वीट केलं आहे. नाना पटोलेंना अटक केली जावी अशी मागणी नितीन गडकरी यांनी केली आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वापरलेली भाषा अतिशय आक्षेपार्ह व निंदनीय आहे. माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे, की पटोलेंवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी,” अशी मागणी नितीन गडकरी यांनी केली आहे.