लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: भाजपच्या शहर आणि जिल्हाध्यक्ष बदलाच्या हालचाली सुरू झाल्या असून, २० मेपर्यत नवीन अध्यक्षांची निवडीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. जिल्ह्यात दोन जिल्हाध्यक्ष नेमण्यात येणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून हे पद मावळ तालुक्याकडे असून, मावळची मक्तेदारी संपुष्टात येण्याची शक्यता आहे.

Due to summer the price of lemon continues to increase
उन्हामुळे लिंबाची दरवाढ कायम
All the Chief Executive Officers of the Zilla Parishad were given instructions regarding the recruitment of teachers Pune print news
शिक्षक भरतीची पुढील प्रक्रिया कधीपासून? शिक्षण विभागाने काय सांगितले?
Radio images of the Sun obtained by scientists pune news
शास्त्रज्ञांनी मिळवली सूर्याच्या रेडिओ प्रतिमा
seven injured after machinery in trailer
लष्कर भागात मोटारीची दहा दुचाकींना धडक; दुचाकीस्वार तरुण जखमी

भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची तीन वर्षांची मुदत संपुष्टात आली आहे. शहराध्यक्षपदासाठी माजी महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, माजी सभागृहनेते गणेश बीडकर आणि धीरज घाटे तसेच माजी आमदार प्रा. मेधा कुलकर्णी या नावांची चर्चा आहे. अध्यक्षपदासाठी कोण सक्षम आहे, याची चाचपणी प्रभारींकडून सुरू झाली आहे. शहरातील आठही विधानसभा अध्यक्ष, विविध आघाड्यांचे प्रमुखांबरोबर त्यादृष्टीने चर्चा करण्यात आली आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शहराध्यक्षाची निवड करण्यात येणार आहे.

आणखी वाचा- उपमुख्यमंत्री फडणवीसांनी फटकारले आणि सरकारी यंत्रणा कामाला…

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यासाठी प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांना प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. शहराध्यक्षपदाची निवड करताना नेत्याच्या मर्जीऐवजी संघटनेतील पदाधिकाऱ्यांची मते विचारात घेऊन निवड होणार आहे. त्यादृष्टीने कार्यकारिणी सदस्य, पक्षसंघटनेतील पदाधिकारी, आमदार आणि खासदारांबरोबर चर्चा सुरू झाली आहे.

शहराध्यक्ष निवडीबाबत शहरात अनेक नावे चर्चेत असताना जिल्ह्यात मात्र अध्यक्ष निवडीचा पेच भाजपपुढे निर्माण झाला आहे. जिल्ह्यात दोन अध्यक्ष निवडण्यात येणार असून उत्तर आणि दक्षिण अशी त्यासाठी रचना करण्यात आली आहे. उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, हवेली, मावळ, तर दक्षिण पुणे जिल्ह्यात मुळशी, भोर, वेल्हा, पुरंदर, बारामती, इंदापूर आणि दौंड हे तालुके असणार आहेत.

आणखी वाचा- अतिक्रमण विभागाच्या कर्मचार्‍यांना मारहाण केल्याप्रकरणी पुणे महापालिकेसमोर आंदोलन

दौंडचे आमदार राहुल कुल वगळता जिल्ह्यात भाजपचा आमदार नाही. यापूर्वी शिरूर आणि मावळ मतदारसंघात भाजपचे आमदार होते. मात्र हे दोन्ही मदारसंघ भाजपच्या हातातून गेले आहेत. मावळ तालुक्याकडे गेल्या काही वर्षांपासून सातत्याने जिल्हाध्यक्षपद होते. मावळ हा भाजपचा पारंपरिक मतदारसंघ असल्याचे बोलले जाते. सन २०१९ च्या निवडणुकीत संजय भेगडे यांचा पराभव झाला. ते पक्षाचे जिल्हाध्यक्ष होते. संजय भेगडे यांचे निकटवर्तीय गणेश भेगडे सध्या जिल्हाध्यक्ष आहेत. खेडमधून शरद बुट्टे पाटील, जिल्हा संघटन सरचिटणीस ॲड. धर्मेंद्र खांडरे, प्रदीप कंद, दौंडमधून राहुल कुल यांच्या नावाची चर्चा आहे.