पिंपरी : महापारेषण कंपनीच्या भोसरीतील अति उच्चदाब उपकेंद्रातील पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये बुधवारी (२३ मार्च) सकाळी सहा वाजता बिघाड झाला. त्यामुळे भोसरी, आकुर्डीसह शहरातील सुमारे ६० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. उन्हाच्या कडाक्यात दिवसभर वीजपुरवठा नसल्याने नागरिकांचे हाल झाले. तर, काम ठप्प झाल्याने उद्योगांना कोटय़वधींचे नुकसान सोसावे लागले. आर्थिक नुकसानीचा आकडा १०० कोटींहून जास्त असल्याचा दावा लघुउद्योजक संघटनेने केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भोसरीतील गवळी माथा येथे महापारेषण कंपनीच्या अति उच्चदाब २२० केव्ही उपकेंद्रामध्ये १०० एमव्हीए क्षमतेचे दोन व ७५ एमव्हीए क्षमतेचा एक असे एकूण तीन पॉवर ट्रान्सफॉर्मर आहेत. त्यातील १०० एमव्हीएचा पॉवर ट्रान्सफॉर्मर गेल्या काही महिन्यांपासून बंद आहे. उर्वरित दोन ट्रान्सफॉर्मरद्वारे महावितरणच्या एकूण २६ वीजवाहिन्यांना वीजपुरवठा करण्यात येतो. यातील १०० एमव्हीएच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये बुधवारी सकाळी बिघाड झाला. त्यामुळे महावितरणच्या एकूण १० वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा खंडित झाला. परिणामी, भोसरी एमआयडीसी परिसरासह नेहरूनगर, यशवंतनगर, शांतिनगर, भोसरी गावठाण, इंद्रायणीनगर, चक्रपाणी वसाहत, शास्त्री चौक तसेच आकुर्डी परिसरातील साडेचार हजार औद्योगिक ग्राहकांसह एकूण ६० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बंद झाला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Breakdown substation power outage customers citizen ysh
First published on: 24-03-2022 at 00:02 IST