नगर रस्त्यावरील बीआरटी प्रकल्पात सुधारणा करण्यासाठी पीएमपी, महापालिका आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींची विशेष समिती नियुक्त करण्यात आली आहे. नगर रस्ता बीआरटी मार्गात सध्या असलेल्या त्रुटी दूर करणे आणि या कामाचा कालबद्ध आढावा घेण्याचे काम या समितीकडे देण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अभिषेक कृष्णा यांच्याकडे या समितीचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. पीएमपीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मयूरा िशदेकर यांच्यासह महापालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख राजेंद्र राऊत आणि पीएमपी प्रवासी मंच, पादचारी प्रथम या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि महापालिका व पीएमपीचे काही वरिष्ठ अधिकारी या समितीचे सदस्य असतील.

गेल्या महिन्यात सुरू झालेल्या नगर रस्त्यावरील बीआरटीबाबत तक्रारी करण्यात येत असून मार्गातील त्रुटी दूर करण्याची मागणी करण्यात आली आहे. बीआरटी मार्गवार सातत्याने होत असणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी स्वतंत्र समिती नियुक्त करण्याबाबत सांगितले होते. त्यानुसार ही समिती नियुक्त करण्यात आली असून समितीची पहिली बठक येत्या सोमवारी (६ जून) होणार आहे. नगर रस्ता बीआरटी मार्गावर महापालिकेतर्फे सुरू असलेल्या उपाययोजनांचा नमित्तिक आढावा घेणे, प्रवाशांना उद्भवणाऱ्या अडचणी दूर करणे आणि बीआरटी मार्गातील सुधारणांसाठी सूचना स्वीकारणे अशा स्वरूपात ही समिती काम करेल, असे अभिषेक कृष्णा यांनी सांगितले.

बीआरटीसाठी आवश्यक पायाभूत सुविधांची निर्मिती महापालिकेमार्फत होत असली, तरी प्रत्यक्ष बस संचलनाचे महत्त्वाचे काम पीएमपीतर्फे केले जाते. म्हणून पीएमपीने बीआरटीसाठी स्वतंत्र मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून शिंदेकर यांची नियुक्ती केली आहे. मात्र, महापालिकेकडूनच कामे रेंगाळत असल्याने पीएमपीला अर्धवट स्थितीत नगर रस्त्यावरची बीआरटी कार्यान्वित करावी लागली होती. या पाश्र्वभूमीवर ही समिती नियुक्त करण्यात आली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Brt project in pune
First published on: 03-06-2016 at 04:57 IST