बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ३ लाख ५२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना बुधवारी (१३ जुलै) आंबेगाव पठारमधील सह्याद्री  रेसिडन्सी येथे घडली. 

याप्रकरणी आकाश दिसले (वय २२ रा. आंबेगाव पठार) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. फिर्यादी आकाश दिसले कुटुंबीयासह आंबेगाव पठार परिसरात राहायला आहेत. कामानिमित्त बुधवारी ते घराबाहेर गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने आणि इतर साहित्य असा मिळून ३ लाख ५२ ऐवज चोरून नेला.

याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक वर्षा घोगरे तपास करत आहेत.