मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज (सोमवार) सकाळी कार व ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोघे जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात लोणावळ्याजवळील वलवण गावाजवळ सकाळी ६.४५ च्या सुमारास घडला. जखमीला उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघालेली भरधाव कार (एमएच १४ इपी ५५५०) जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील लोणावळा महाविद्यालयासमोर आल्यानंतर मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघालेला ट्रक (एमएच २० एडी १०१५) यांच्यात समोरासमोर जोराची धडक बसली. अपघात इतका भीषण होता की, कारचा चक्काचूर झाला होता. कारमधील चालकासह दोघांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Car truck accident near lonavala 2 dead 1 injured mumbai pune express way
First published on: 22-05-2017 at 10:22 IST