राज्यात निसर्गरम्य समुद्र किनारे, ऐतिहासिक किल्ले, पर्वतरांगा, थंड हवेची ठिकाणे, नदी, वनसंपदा, ऐतिहासिक वारसास्थळे, लेणी, धरणे अशी अनेक पर्यटनाची ठिकाणे आहेत. यातील अनेक ठिकाणी हॉटेल वा निवासस्थानांच्या सोयी कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. तसेच अनेक ठिकाणी बांधकामासाठी कायमस्वरूपी प्रतिबंध घालण्यात आले आहेत. अशा ठिकाणी कॅराव्हॅन व कॅम्परव्हॅनच्या साहाय्याने पर्यटकांना निवासाच्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे धोरण राज्य शासनाने तयार केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्याला वैविध्यपूर्ण सौंदर्य लाभले आहे. या ठिकाणी कॅराव्हॅन पर्यटनासाठी मोठा वाव आहे. अतिदुर्गम भागात हॉटेल, निवासस्थानांसारख्या राहण्याच्या सोयी कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. अशा ठिकाणी, तसेच ज्या क्षेत्रामध्ये कायमस्वरूपी बांधकामासाठी प्रतिबंध घालण्यात आले आहेत, अशा ठिकाणी कॅराव्हॅन व कॅम्परव्हॅनच्या साहाय्याने पर्यटकांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देता येतील, अशा स्वरूपाचे हे धोरण आहे. या बरोबरच जेथे सध्या पक्के  बांधकाम असलेल्या निवासव्यवस्था उपलब्ध नाहीत, अशा ठिकाणी कॅराव्हॅन पर्यटन करता येईल. या अनुषंगाने कॅराव्हॅन पर्यटन धोरण तयार करण्यात आले आहे. कॅराव्हॅन पर्यटन धोरणाबाबत नागरिकांकडून हरकती, सूचना मागवण्यात आल्या आहेत. कॅराव्हॅन धोरणाचा मसुदा पर्यटन संचालनालयाच्या http://www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. या कॅराव्हॅन धोरणाबाबत सूचना व हरकती   diot@maharashtratourism.gov.in   आणि  asdtourism.est-mh@gov.in या ई-मेलवर ३ ऑक्टोबपर्यंत पाठवण्याचे आवाहन पर्यटन संचालनालयाकडून करण्यात आले आहे, अशी माहिती पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालक सुप्रिया करमरकर-दातार यांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Caravan tourism in the state soon abn
First published on: 01-10-2020 at 00:19 IST