पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार दहावीची परीक्षा १५ फेब्रुवारी ते १० एप्रिल, तर बारावीची परीक्षा १५ फेब्रुवारी ते २ एप्रिल या कालावधीत होणार आहे. सीबीएसईने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. सीबीएसईने २०२२-२३च्या निकालावेळीच दहावी आणि बारावीच्या परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना विषयनिहाय, दिनांकनिहाय वेळापत्रकाची प्रतीक्षा होती.

हेही वाचा >>> आयबीपीएस प्रशिक्षणासाठी बार्टीने किती कोटी रुपये खर्च केले? माहिती अधिकार अर्जातून उघड झाली आकडेवारी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता सीबीएसईने सविस्तर वेळापत्रक जाहीर केल्याने विद्यार्थी आणि पालकांना दिलासा मिळाला आहे. सीबीएसईच्या वेळापत्रकानुसार सुमारे ५५ दिवस या परीक्षा चालणार आहेत. सविस्तर वेळापत्रक  https://www.cbse.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. परीक्षेदरम्यान दोन विषयांमध्ये पुरेसा कालावधी ठेवण्यात आला आहे. वेळापत्रक तयार करताना जेईईसारख्या स्पर्धात्मक परीक्षांचा विचार करण्यात आला आहे. परीक्षेपूर्वी बराच काळ आधी दिनांकनिहाय वेळापत्रक जाहीर केल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे, असे सीबीएसईने स्पष्ट केले.