करोना संकट काळात नागरिकांना मदत करणाऱ्या रूग्णवाहिका चालकांना राखी बांधून पिंपरीत रक्षाबंधन उपक्रम साजरा करण्यात आला. यासाठी पिंपरीतील युवतींनी पुढाकार घेतला.

पिंपरी शहर राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या वतीने पालिकेच्या यशवंतराव चव्हाण रूग्णालयात हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. स्वतच्या जीवाची पर्वा न करता दोन वर्षाच्या कठीण काळात दिवसरात्र प्रामाणिकपणे काम करणाऱ्या रूग्णवाहिका चालकांना यावेळी राखी बांधण्यात आली. वाहनचालकांनाही समाजात महत्वाचे स्थान आहे, हे मह्त्त्व पटवून देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न असल्याचे युवती अध्यक्षा वर्षा जगताप यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुहास पलांडे, नवनाथ वाडेकर, विजय शेलके, रामचंद्र जगताप, गणेश कामते, सचिन सुतार, नंदकुमार शिखरे, नरेंद्र पाटिल, राहुल माटेकर आदी वाहनचालकांना राखी बांधण्यात आली. या उपक्रमात शलाका बनकर, मेहेक इनामदार, शुभदा पवार, भव्यशीला गायकवाड़, मेघना जगताप, वैभवी गावड़े, वैष्णवी जगताप आदी युवतींनी सहभाग घेतला.