scorecardresearch

“रिकामटेकड्या लोकांना…”, महात्मा फुलेंबाबत केलेल्या विधानावर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया

चित्रा वाघ यांनी काही दिवसांपूर्वी भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांची तुलना महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी केल्यामुळे नवा वाद निर्माण झाला होता.

chitra wagh and mahatma phule and chandrakant patil
चित्रा वाघ, महात्मा फुले, चंद्रकांत पाटील (फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यात पार पडलेल्या कार्यक्रमात भाजपाचे नेते व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची तुलना थेट महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी केल्यामुळे नवा वाद निर्माण झाला होता. त्या विधानावरून विरोधकांनी चित्रा वाघ यांच्यावर जोरदार टीकास्त्र केलं होतं.

संबंधित टीकेबाबत विचारलं असता चित्रा वाघ म्हणाल्या की, रिकामटेकड्या लोकांना काय वादच लागतात. त्यांना काही काम आहे का? मी एवढंच म्हटले की, महिलांना पुरुषांनी ओवाळले, तर ते तुम्हाला नको आहे का? ती चांगली गोष्ट आहे ना, चंद्रकांत दादांनी भाषणात सांगितले की, आम्हाला प्रत्येक वेळी बहिणी ओवाळतात.आमचं अभिष्टचिंतन करतात. आमच्यासाठी यश मागतात. त्यामुळे बंधूंनीही बहिणींसाठी यश मागितलं तर ते कुठे वाईट आहे. माझ्या आजवरच्या कारकीर्दमध्ये पहिल्यांदाच मला पाच पुरुषांनी ओवाळलं आहे. हे दादामुळे झालं असून मी त्यांची ज्योतिबा फुलेंशी तुलना केली नाही.

त्यांनी जी वाट दाखवली आहे. त्या वसा आणि वारसा यावर चालणारी ही लोक आहेत. महात्मा ज्योतिबा फुले यांनी काय केल? तर त्यांनी सावित्रीबाई फुले यांना पुढे केले. त्यामुळे महिलांना जर ज्योतिबाकडून म्हणजेच पुरुषांकडून ओवाळलं जात असेल तर त्यामध्ये वाईट काय आहे. त्यामध्ये वाईट असण्याच कारण समजत नाही. दोघेजण रिकामटेकडे बसलेले आहेतच एक इथे आणि एक तिकडे रिकामटेकडे उठले की आपलं चपर चपर चालूच अशा शब्दात त्यांनी विरोधकांना सुनावले.

तसेच त्या पुढे म्हणाल्या की, मी चंद्रकांत पाटलांची ज्योतिबा फुलेंशी तुलना केली नाही. मी त्यांच्या पक्षात (राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये) असताना प्रत्येक कार्यक्रमात ते वाक्य वापरलं आहे.त्यावेळी कोणीही त्या शब्दावर आक्षेप घेतला नाही. अशी आठवण करून देत त्यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-02-2023 at 18:58 IST
ताज्या बातम्या